Pune Crime News | लोणी काळभोर, कोंढवा आणि सिंहगड रोड परिसरात घरफोडीच्या घटनामध्ये 9 लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये घरफोडीच्या घटनामध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे (House Breaking And Trespassing (HBT). पुणे शहरातील विविध भागात घरफोडीचे गुन्हे घडले असून चोरट्यांनी 9 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. पुणे शहरातील हिंगणे, कोंढवा, लोणी काळभोर याठीकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. (Pune Crime News)

हिंगणे खु. येथील मयुर एजन्सी नावाच्या किराणा मालाच्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील लॅपटॉप, रोख रक्कम, ड्रायफ्रुट्स असा एकूण 55 हजार रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार गुरुवारी (दि.23) सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी विठ्ठल अल्लडवार (वय-38 रा. आनंदनगर, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध आयपीसी 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

रोख रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला

कोंढवा येथील गोकुळनगर येथील शिवदत्त डेअरी फर्ममधून चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार गुरुवारी (दि.23) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास उघडकीस आला आहे. चोरट्याने डेअरीचे शटरचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. गल्ल्यातील 500, 100, 200 रुपये दराच्या एकूण 4 लाख 5 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सदाशिव येडबा वाघमारे (वय-57) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध आयपीसी 456, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दोन लाखांच्या तांब्याच्या प्लेटची चोरी

कोंढवा येथील यश अर्थिंग सोल्युशन प्रा. लि. या कंपनीचा पत्रा उचकटून चोरट्यांनी कंपनीमधील दोन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार 12 नोव्हेंबर दुपारी 12 ते 16 नोव्हेंबर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान पीसोळी येथे घडला आहे. याबाबत प्रिती जयकुमार बेलसरे (वय-33 रा. उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. चोरट्यांनी फिर्य़ादी यांच्या कंपनीचा पत्रा उचकटून 1 लाख 99 हजार 500 रुपये किमतीच्या तांब्याच्या प्लेट चोरून नेल्या आहेत. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे करीत आहेत.

हार्डवेअर दुकानात चोरी

चोरट्यांनी हार्डवेअर दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानातून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला.
हा प्रकार 20 नोव्हेंबर रात्री 9 ते 21 नोव्हेंबर सकाळी 9 या दरम्यान लोणी काळभोर येथील चंदन पेंट अँन्ड हार्डवेअर दुकानात घडला आहे. याबाबत दुकानाचे मालक लालाराम सुरजमल चौधरी (वय-54 रा. पिंगळे वस्ती, मुंढवा) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्य़ाद दिली आहे. चोरट्यांनी फिर्य़ादी यांच्या दुकानातील 2 लाख 17 हजार 013 रुपये किंमतीचा माल चोरून नेला. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोरे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | संरक्षण दलातील अधिकाऱ्याची तब्बल 74 लाखांची फसवणूक,
दापोडी मधील घटना

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार