Pune Crime News | गोडावूनचा ताबा सोडण्यासाठी 17 लाखांची मागणी, पुण्यातील कामगार संघटनेच्या अध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गोडावूनचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून गैर परवानगीने ताबा घेतला. हा प्रकार 8 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान महर्षीनगर येथे घडला होता. गोडाऊनचा ताबा सोडण्यासाठी 17 लाख रुपयांची मागणी केल्या प्रकरणी बहुउद्देशीय कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव घोरपडे (Namdev Ghorpde) यांच्यासह इतरांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) खंडणीसह (Extortion Case) इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत रोनक शहा (वय-37 रा. कल्पतरु सोसायटी, शंकरशेठ रोड, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन त्रिवेणी इंगोले, नामदेव घोरपडे यांच्यासह इतर पाच ते सहा कर्यकर्त्यांवर आयपीसी 143, 147,384, 504, 506(2) सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडिलांचा छपाईचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसायाकरिता लागणारा माल महर्षीनगर येथील गोडावूनमध्ये ठेवला आहे. या जागेवरुन फिर्यादी व आरोप यांच्यात वाद आहे. आरोपी नामेदव घोरपडे हे पुण्यातील बहुउद्देशीय कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी 8 ऑक्टोबर रोजी फिर्यादी यांच्या ताब्यात असलेल्या गोडावूनच्या शटरचे कुलूप तोडून गैर परवानगीने ताबा घेतला.

ताबा सोडण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे 17 लाख रुपयांची मागणी केली. आरोपींनी याठिकाणी महापुरुषांचे फोटो लावून झेंडे लावले आहेत. तसेच हे फोटो काढल्यास विटंबना केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, सहकारनगर व कोरेगाव पार्क परिसरातील घटना

Pune Crime News | लोणी काळभोर, कोंढवा आणि सिंहगड रोड परिसरात घरफोडीच्या घटनामध्ये 9 लाखांचा ऐवज लंपास

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार