चंद्रयान-2 च्या ऑर्बिटरनं पुढच्या ‘चंद्र’ मिशनसाठी तयार केली ‘स्पेस’, पाठवले महत्वाचे फोटो

ADV

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताला चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्यात अपयश आले असले तरी या उपक्रमात ऑर्बिटर यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत स्थापित झाला आहे, यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावरील लँडिंगच्या प्रयत्नांची संधी वाढली आहे. ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे जमा केली आहेत. या छायाचित्रांच्या मदतीने भविष्यातील चंद्र मिशनमध्ये यश मिळवता येऊ शकते. कारण चंद्राच्या पृष्ठभागाची अचूक माहिती मिळाली आहे. ऑर्बिटरने पाठवलेल्या छायाचित्रांद्वारे लँडिंगच्या जमीनीबाबत माहिती मिळेल आणि लँडिंग सोपे होईल.

ऑर्बिटरला चंद्राच्या कक्षेत स्थापित केल्याच्या घटनेला एक वर्ष झाले. या दरम्यान ऑर्बिटरने चंद्राच्या 4400 फेर्‍या पूर्ण केल्या आहेत. सोबतच 1056 वर्ग किमी क्षेत्राला कव्हर करत 22 छायाचित्रे पाठवली आहेत, ज्यांचा उपयोग पुढील लँडिंगसाठी केला जाऊ शकतो. छायाचित्रांतून या क्षेत्रातील पर्वतांची रूंदी-उंची, एकमेकांपासून अंतर, खड्डे आणि त्यांची खोली, समतोल पृष्ठभाग, उतरंड आणि चढण, यांची सविस्तर माहिती मिळाली आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून इस्त्रो सहजपणे पुढील मिशनमध्ये लँडिंगच्या जमीनीचा शोध घेऊ शकते.

ADV

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, ऑर्बिटरमध्ये सात वर्षांपर्यंत परिक्रमा करण्यासाठी इंधन पुरेसे आहे. भविष्यात भारत केवळ लँडर आणि रोव्हर पाठवून चंद्रयान मिशन पूर्ण करू शकते. कारण मिशनसाठी सध्याचे ऑर्बिटर काम करू शकते. इस्त्रोने माहिती दिली की, ऑर्बिटरच्या टॅरेन मॅपिंग कॅमर्‍याच्या मदतीने आतापर्यंत 40 लाख वर्ग किमी परिसरांच्या छायाचित्रांचा डाटा पाठवला आहे.