प्रशासकीय बदल्यांमधील गोंधळ उघड, 2 सनदी अधिकाऱ्यांच्या दोनदा बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीमधल्या प्रशासकीय बदल्यांधील गोंधळ पुन्हा उघड झाला आहे. दोन महिन्यांच्याआत दोन सनदी अधिकाऱ्यांची दोनदा बदली करण्यात आली आहे. अनुप कुमार यादव यांची अवघ्या 20 दिवसात दुसऱ्यांदा बदली करणयात आली आहे. 23 जुलै रोजी त्यांची आरोग्य खात्यातून विक्रीकर विभागात बदली करण्यात आली होती. तर आज (बुधवार) त्यांची पुन्हा विक्रीकर विभागातून आदिवासी विकास विभागातील प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली.

तर विनिता संघल यांची 20 जून रोजी फिल्म सिटीमधून आदिवासी विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांच्या आत त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली कामगार विभागात करण्यात आली आहे. यापूर्वी मुंबईतली 10 पोलीस उपायुक्तांच्या गृहखात्याने केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांमध्ये रद्द केल्या होत्या. आणि बदली झालेल्या अधिकाऱ्याना पुर्वीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांच्या बदल्या रद्द केल्यानंतर राज्यात मोठा वादंग उठला होता. विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. तर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनाही मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर भेटायला बोलावलं होत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like