नोकरीचे आमिष दाखवून ती अोढायची जाळ्यात, मात्र पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

नागपूर : पोलीसनामा आॅनलाईन
नोकरीचे अामिष दाखवून युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक तरुणासह 4 महिलांचा समावेश आहे. आरोपींना नवी मुंबई व ठाणे येथून नागपूर पोलिसांनी अटक केली असून, रितेश बैरवा हा या टोळीचा मुख्य सुत्रधार आहे. यावेळी आरोपींकडून ११ मोबाईल फोन,२५ सीम कार्ड,२७ एटीएम कार्डसह २ संगणक व १ लॅपटॉप असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
[amazon_link asins=’B07335K95J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ceb366f5-a53a-11e8-a483-c37e8cca1c60′]नोकरी लावण्याच्या जाहिराती सोबतच महिलांशी मैत्रीच्या जाहिराती आरोपी वर्तमान पत्रात द्यायचे. एवढेच नाही तर बेरोजगारांना नोकरीच्या जाळ्यात खेचण्यासाठी आरोपीने पुणे येथील विविध बॅंकात तब्बल 28 खाती उघडली होती. आरोपी ठाण्यात बसून ही खाती चालवत असत. केवळ आठवी पर्यंत शिक्षण घेतलेला आरोपी रितेश मागील 5 ते 6 वर्षापासून तरुणांची फसवणूक करीत होता. मात्र अनेक तरूण फसून देखील बदनामीच्या भितीपोटी कोणीही समोर येण्यास तयार नव्हते. या कामासाठी आरोपीने ठेवलेल्या चारही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.