आमरस पिताय ? सावधान ! बाजारात रसायनमिश्रीत आमरस, ‘FDA’कडून लाखो रुपयांचे आमरस जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उन्हाळा म्हटलं की आमरस खाण्याकडे सर्वांचा ओढा असतो. त्यामुळे आमरसाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु आमरस खाण्याआधी सावधान ! कारण या मागणीचा गैरफायदा घेत काही जण रसायन मिक्स करून आमरस तयार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अन्न औषध प्रशासनानं मुलुंड येथे राज इंडस्ट्रीयल इस्टेट येथील विजय स्टोअर्समध्ये रसाच्या कारखान्यावर धाड टाकून आमरसात मिसळले जाणारे रसायन आणि ८ लाख ८७ हजार रुपये किंमतीचे ३ हजार ४२५ किलो रसायन जप्त केले आहे.

काही जण आमरसात रसायन मिसळून ते विकत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने मुलुंड येथील राज इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये असलेल्या विजय स्टोअर्स मध्ये आंब्याचा रस तयार करण्याच्या कारखान्यावर छापा घातला. त्यावेळी रसायन आणि रस जप्त करण्यात आला. रसाचे काही नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठिण्यात आले आहेत. त्यात प्रमाणापेक्षा जास्त रसायनाचे प्रमाण आढळल्यास ५ लाख रुपयांचा दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.