दीपिका पादुकोण आपला 34 वा वाढदिवस नवऱ्यासोबत नाही तर यांच्यासोबत करणार साजरा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ५ जानेवारी रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. सध्या दीपिका आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढणे दीपिकाला कठिण होत आहे. तरी देखील दीपिका आपल्या वाढदिवसासाठी एक खास प्लॅन करीत आहे.

https://www.instagram.com/p/B4xgmrjjrBu/

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, दीपिका ५ जानेवारीला आपल्या ३४ वा वाढदिवस साजरा करीत आहे. ती तिचा वाढदिवस लखनऊमध्ये अ‍ॅसिड अटॅक पीडितांसोबत साजरा करणार आहे. आपला पुर्ण दिवस ती त्यांच्यासोबत घालवणार आहे. आजुबाजुंच्या शहरामधील अ‍ॅसिड अटॅक पीडिता उपस्थित असणार आहे. दीपिका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीमध्ये ही जाणार आहे.

https://www.instagram.com/p/B6xityTDhEq/

यापूर्वी वाढदिवसाच्या प्लॅनबद्दल दीपिका म्हणाली होती की, ‘मी वाढदिवसाबद्दल काहीच विचार केला नाही. कारण चित्रपटाच्या प्रमोशनचे इतके काम चालू आहे. सध्या माझी सर्व एनर्जी चित्रपटाच्या प्रदर्शितवर केंद्रित आहे. मी अद्याप काहीच विचार केला नाही.’ आश्चर्याची गोष्ट म्हणजे दीपिकासाठी जानेवारी महिना खूप खास आहे. या महिन्यात तिचा वाढदिवस आहे आणि तिचा ‘छपाक’ चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/B6cerrbj8Nu/

चित्रपटाविषयी बोलायचे म्हणले तर, ‘छपाक’चे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. 10 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हरची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. लग्नानंतर दीपिका कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. लग्नानंतरचा हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. दीपिका शेवटी ‘पद्मावत’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात रणवीर सिंग आणि शाहिद कपूरसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

https://www.instagram.com/p/BjhYgLShiuw/

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/