छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील मानाचा पहिला पालखी सोहळा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन (अरुण ठाकरे) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची ओढ अखंड दुर्ग सेवकांना लागली असून पालखीचे अनेक ठिकाणी स्वागत मैदानी खेल, पोवाडे, गड किल्ल्यांच्या संदर्भात माहिती, व्याख्यान आयोजन केले आहे. सह्याद्री प्रतिष्ठान चे दुर्गसेवक अनेक गडांवर तोफ गाडे, बुरुंज दुरुस्ती, महा दरवाजे साफ सफाई, दिशा दर्शक फलक लावून शिवकार्य दुर्गसेवक करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी हि चिंचोली गुरव (संगमनेर) येथून दिनांक २ फेब्रुवारी २०२० रोजी किल्ले शिवनेरी कडे मार्गस्थ होणार आहे. दिनांक ३ फेब्रुवारी २०२० रोजी किल्ले शिवनेरी हुन मजल दरमजल करत माळशेज घाट मार्गे पालखी सोहळा किल्ले रायगड कडे मार्गस्थ होत आहे. सोहळ्याचा पहिला मुक्काम दिनांक ३ फेब्रुवारी २०२० रोजी धसई येथे तर दुसरा मुक्काम धसई, नारीवली मार्गे म्हासा येतून दिनांक ४ फेब्रुवारी २०२० रोजी हालीवली, ता. कर्जत येथे, तिसरा मुक्काम हा दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ रोजी पेण, ता.पेण येथे तर चौथा अंतिम मुक्काम दिनांक ६ फेब्रुवारी २०१९ रोजी हा पाचाड ता. महाड, जि. रायगडयेथे होणार आहे. यात्रेचा समारोप हा दिनांक ७ फेब्रुवारी २०१९ रोजी किल्ले रायगड येथे होईल.

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित शिवरथ यात्रा २०२० वर्ष दहावे “छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील मानाचा पहिला पालखी सोहळा” ओळखला जातो ३ तारखेला संध्याकाळी ६ वाजता धसई गावामध्ये पालखीचे आगमन होणार असून पालखीचा भव्य मिरवणूक सोहळा, व्याख्यान तसेच मैदानी खेळ व रायगड भूषण शाहीर वैभव घरत यांचा पोवाडा, जगप्रसिद्ध आजीबाई शाळेचे शिक्षक योगेंद्र बांगर सर यांचे व्याख्यान, दुर्गसंवर्धन गीत कु पंकज हरड असे अनेक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास शहीद भाईकोतवाल पिक्चरचे दिग्दर्शक एकनाथ देसले, पत्रकार अरुण ठाकरे उपस्तीत राहणार असून मोठ्या संख्येने दुर्गसेवक, शिव प्रेमी, शिव रथ यात्रेची आतुर तेने वाट पाहत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा