जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता झालेल्या पी. चिदंबरम यांचा ‘हा’ आहे अलिशान बंगला (फोटो)

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम चांगलेच अडचणीत आले असून त्यांच्यावर अटकेची तलवार टांगलेली आहे. ईडी आणि सीबीआय त्यांच्या चौकशीच्या फेऱ्यात ते अडकले असून आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यामुळे चिदंबरम बेपत्ता आहेत. त्यांचा फोनही बंद आहे. पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला असून या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

यापूर्वी मंगळवारी रात्री उशिरा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चिदंबरम यांच्या घराबाहेर ही नोटीस चिकटवली होती. या नोटीसमध्ये त्यांना दोन तासांत हजर राहण्यास सांगितले गेले, परंतु ते हजर झाले नाहीत. दुसरीकडे, पी. चिदंबरम यांनी देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना परवानगी दिली जाऊ नये, अशी माहिती देशातील सर्व विमानतळांना देण्यात आली आहे.

असा आहे कोट्यवधींचा बंगला :
सीबीआयने जेथे कारवाई केली तो पी चिदंबरम यांचा बंगला जोरबाग येथे आहे. या आलिशान बंगल्याची किंमत १६ कोटींपेक्षा जास्त सांगितली जात आहे. चिदंबरम यांचे नियमित वास्तव्य या बंगल्यात होते.जरी अद्याप बंगल्याच्या आत कोणालाही परवानगी नाही, परंतु बाहेरून पाहता बंगला अगदी मोथा आणि आलिशान दिसत आहे. घरात कार पार्किंगही आहे जेथे अनेक वाहने उभी दिसतात.

बंगल्याच्या आवारात बरीच झाडेही दिसतात. संपूर्ण परिसर हिरवागार आहे. चिदंबरम यांचे संपूर्ण कुटुंब या बहुमजली बंगल्यात राहत आहे. त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरमही कधीकधी येथे असतो. मंगळवारी रात्री सीबीआय आणि ईडीची टीम बंगल्यावर पोहोचली तेव्हा चिदंबरम तेथे सापडले नाहीत. यानंतर गेटवर नोटीस चिकटविण्यात आली, ज्यावर असे लिहिले होते की ते दोन तासांत कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे.

चिदंबरम यांनी लाचखोरीच्या पैशाने आयएनएक्स मीडिया प्रकरणात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचा दावा ईडीने केला आहे त्यामुळे चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे.