मुख्यमंत्री रिलीफ फंडात मदत द्या, सभापती सुनंदाताई गायकवाड यांचे आवाहन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन  –   फुल न फुलाची पाकळी म्हणून ज्यांची ऐपत आहे अशा व्यक्ती नी मा.मुख्यमंत्री रिलीफ फंडात आर्थिक मदत द्यावे असे आवाहन सभापती सुनंदाताई गायकवाड यांनी जनतेला केले आहे.

राज्यात विशेष करून सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे अशा वेळी सुशिक्षित व्यक्ती किंवा संस्था अथवा मंडळांनी गांभीर्याने राहणे गरजेचे आहे.

कोणीही आपले वाढदिवस घरी साजरे करू नयेत, तसेच आपले छोटे छोटे कार्यक्रम घरी आयोजित करू नयेत. केवळ प्रसिद्धी साठी ही कसलेच कुणी ही स्टंट करू नयेत .

आपल्या घरातील छोटे कार्यक्रम किंवा वाढदिवसाचे कार्यक्रम न करता ते रद्द करून त्यावर होणारा खर्च टाळून तो मा. मुख्यमंत्री रिलीफ

फंडात आर्थिक मदत द्यावे असे आपणांस सर्वांना कळकळीची विनंती करत आहे. असे आवाहन अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुनंदाताई सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

सर्वांनी फुल न फुलांची पाकळी म्हणून या रिलीफ फंडाला शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करावी, असे ही त्यांनी म्हंटले आहे.

सध्या मजुर व गोरगरीब,जनतेची कामे लॉक डाऊन असल्यामुळे बंद आहेत, लोकांची मोलमजुरी बंद आहे, शेतीची कामेधंदे बंद आहेत, यासाठी गोरगरिब लोकांची होरपळ होऊ नये, त्यांना दैनंदिन अडचणी येऊ नयेत,व कोरोना रोगाच्या साथी विरोधात लढण्यासाठी आणि गोरगरीब लोकांना सांभाळण्यासाठी आर्थिक गरज लागते, ती शासनाकडे पुरेशा प्रमाणात रहावी म्हणून,तमाम जनतेनी खारीचा वाटा उचलतमा. मुख्यमंत्री फंडात आर्थिक मदत द्यावी,असेही आवाहन गायकवाड यांनी केले आहे.