Coronavirus : लक्षण नसलेल्या प्रकरणामुळे चीनची डोकेदुखी वाढली, हुबेई प्रांतात आढळले रुग्ण, महामारी परतण्याचा धोका

बीजिंग : वृत्तसंस्थ – चीनमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणे अद्यापही दिसून येत आहेत. यामध्ये लक्षण असलेली आणि लक्षणे नसलेली दोन्ही प्रकरणे आहेत. ताज्या माहितीनुसार, रविवारी कोरोनाचे नवीन 39 रुग्ण आढळले तर शनिवारी 30 रुग्ण आढळले आहेत. चीनेच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) सोमवारी सांगितले की, रविवारी देशात लक्षण नसलेल्या 78 कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. तर एक दिवस अधिच 47 अशाच प्रकारची प्रकरणे आढळून आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली गेली असली तरी बाहेरून येणारी आणि लक्षण आढळून न येणाऱ्या प्रकरणामुळे चीनची चिंता वाढली आहे.

महामारी परत येण्याचा धोका
कोणतीही लक्षणं नसलेल्या प्रकरणामध्ये, रुग्णांना जास्त त्रास होऊ शकत नाही परंतु ते इतरांना संक्रमित करु शकतात. एनएचसीच्या प्रवक्त्या मेई फेंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चीनने सतर्क राहण्याबरोबरच ही माहामारी पुन्हा परत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. चीनमध्ये अलीकडील काळात लक्षण नसलेल्या 705 रुग्णांवर नियंत्रणी ठेवली जात आहे. यातील निम्मे रुग्ण कोरोनामधील सर्वाधिक प्रभावित हुबेई प्रांतातील आहेत. लक्षण नसलेली प्रकरणे मागील आठवड्या समोर आल्याने चीनची चिंता वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय सीमा बंद
चीनच्या एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, लक्षण नसलेले विविध भागात संक्रमित आढळून आल्याने 45 महाविद्यलये महामारी मुक्त श्रेणीतून वगळ्यात आले आहेत. संक्रमण नसलेल्या परिसरात राहणाऱ्या लोकांना दिवसाचे दोन तास घर सोडण्याची परवानी आहे. चीनमध्ये आतापर्यंत 81 हजार 708 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3331 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गामुळे चीनने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या आहेत. 1 एप्रिल पासून परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे.

चार्टर्ड विमानाने लोक परतत आहेत
कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या नवीन प्रकरणापैंकी 38 लोक रविवारी परदेशातून आले आहेत. शनिवारी अशाच प्रकारे 25 जणांना ताब्यात घेतले आहे. यापैकी 20 प्रकरणे रुसला लागून असलेल्या हेलोन्गजियांग सीमावर्तीत भागात प्रवेश करणारे आहेत. हे सर्व चीनी नागरिक असून ते मॉस्कोहून व्लादिवोस्तोक मार्गे मायदेशात परत आले आहेत. परदेशात शिक्षण घेत असलेले 16 लाख विद्यार्थ्यांमार्फत देशात संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. चीनने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली असली तरी बरेच श्रीमंत घरातील विद्यार्थी चार्टर्ड विमानाने घरी परतत आहेत.