आम्हाला ‘राष्ट्रभक्ती’ शिकवू नका : संजय राऊत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्होट बँक राजकारणाला आमचा विरोध आहे. पुन्हा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका. मानवतेला कुठलाही धर्म नसतो. मानवतेच्या हिताचे जे आहे, त्यांची आम्ही बाजू घेणार. त्यामुळे आम्हाला कोणी राष्ट्रभक्ती शिकवू नये, असे म्हणत संजय राऊत यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून भाजपावर निशाणा साधला आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘मानवतेला कुठलाही धर्म नसतो. मानवतेच्या हिताचे जे आहे, त्यांची आम्ही बाजू घेणार. विधेयक राज्यसभेत मांडल्यानंतर काय चर्चा होईल याकडे आमचं लक्ष असणार आहे. विधेयकाबाबत काही प्रश्न आहेत. सरकारने आमच्या शंकांचं निरासन करणं गरजेचं आहे. जर आम्हाला उत्तर मिळाले नाही, तर आम्ही त्यांना विरोध करणार. शिवसेना कधीही कोणाच्या दबावात येत नाही. ‘

सोमवारी (9 डिसेंबर) रोजी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत 311 विरुद्ध 80 मतांनी मंजूर झाले आहे. लोकसभेत शिवसेनेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला समर्थन करत सरकारच्या बाजूने मतदान केले. मात्र लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं राज्यसभेत वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. याविषयी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार असून चर्चेसाठी सहा तासांचा अवधी देण्यात आला आहे. दरम्यान लोकसभेत विधेयकाला पाठिंबा देणारी शिवसेना राज्यसभेत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

फेसबुक पेज ला लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/