धक्कादायक ! अर्धनग्न होऊन नाचणारे 7 तृतीयपंथी पोलिसांच्या ताब्यात, वैद्यकीय तपासणीत चौघे पुरूष निघाले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टियाला पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या 7 किन्नर पैकी 4 किन्नर खोटे असल्याचे समोर आहे. ते वास्तवात पुरुष आहेत. हा खुलासा त्यांची वैदकीय तपासणी करण्यात आल्यानंतर झाला. ही माहिती देताना पटियालाचे एस एस पी मनदीप सिंह सिद्धू यांनी सांगितले की सिविल लाइन पोलिस स्टेशनच्या हद्दीत 10 ऑक्टोबरला एफ आय आर नंबर 272, आयपीसी कलम 353, 186, 332, 160, 294, 427, 341, 323, 506, 148, 149 आणि डॅमेज टू पाब्लिक प्रॉपर्टी कायदा 1984 अंतर्गत गुन्ह्यांतर्गत 2 ढाबा मालकांसह किन्नरांना ताब्यात घेण्यात आले.

चार तर पुरुष –
त्यांच्याकडून फव्वारा चौकाजवळ नगर निगम पटियालाच्या गटावर हल्ला करण्याबरोबर तेथून ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास देण्यात येत होता. या प्रकरणी ताब्यात घेण्यता आलेले पेंटू. सरोड, पिंकी,काजल, ममता आणि नूरी यांना न्यायलायीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांची वैदकीय तपासणी करण्यात आल्यानंतर सत्य समोर आले की किन्नर ममता, नूरी, सरोज आणि काजल हे खोटे असून ते पुरुष आहेत, परंतू स्वताला किन्नर म्हणवतात. एस एस पी सिद्धू यांनी सांगितले की किन्नर नैंसी आणि पिंकी किन्नर आहेत त्यांना नाभा तुरुंगात बंद करण्यात आले आहे. जर बाकीच्यांना पटियाला केंद्रीय तुरुंगात ठेवण्यात आले आहे. एस एस पी सिद्धू म्हणाले की कोणाला ही कायदा आपल्या हातात घेण्याची गरज नाही आणि असे करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात येईल.

कन्नर झाले विवस्त्र –
पोलिसांनी हा गुन्हा नगर निगमच्या लॅंड ब्राँचचे सुपरिटेडंट सुनील मेहता यांच्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आला. ज्यात मेहता यांनी तक्रार दाखल केली आहे की ते आपल्या काही सहाय्यकांबरोबर गाडीवर बसून दुकानदारांनी बाहेर ठेवलेले सामान आणि अनाधिकृत स्टॉल हटवत होते, जेव्हा फव्वारा चौकात ते पोहचले त्यावेळी पेटूं आपल्या पराठ्याच्या दुकानावर काऊंटर लावून पराठे बनवून विकत होता. जेव्हा त्याचे काऊंटर हटावण्यात आले. तेव्हा सुपरिटेंडंट मेहता यांच्या गाडीमध्ये बसायला लागले, परंतू पेंटूने गाडीच्या पुढे येऊन काऊंटर नेण्यास नकार दिला, जेव्हा नगर निगमच्या टीम ने रिकवरी ट्रक मागवला तेव्हा पेंटूने आपल्या काही साथीदारांना बोलावून घेतले, या दरम्यान किन्नरांनी येऊन हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली.

पेंटूने एक वीट उचलून टीमवर फेकली जी शिपाई अजय कुमार यांना लागली. त्यानंतर राजूने एक दगड उचलला आणि मारला, जो कर्मचारी सुखचैन सिंह यांना लागला, काहीनी सरकारी गाडीची उजव्या बाजूची काच फोडली. किन्नरांनी कपडे काढून रस्त्यावर विरोध प्रदर्शन केले, त्यानंतर पोलीस येत असल्याचे पाहताच संधी साधून फरार झाले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like