समुद्रात बुडून मुंबई होणार ‘गायब’ ! नवीन संशोधनात धक्कादायक ‘दावे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  एका नवीन रिसर्चच्या अनुसार समुद्रातील पाण्याची  वाढती पातळी  येणाऱ्या काळात धोकादायक ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार २०५० पर्यंत मागील अंदाजापेक्षा ३ टक्के जास्त लोकांना या समुद्राच्या वाढत्या पातळीचा धोका निर्माण होणार आहे. एवढेच नव्हे तर याचा परिमाण देशाची आर्थिक राजधानी मुंबई डुबण्याची शक्यता आहे.
न्यू जर्सीतील विज्ञान संस्था हवामान केंद्राने यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘नेचर कम्युनिकेशन’ नावाच्या एका वृत्तपत्रात या रिसर्च संदर्भात माहिती देण्यात आली आहे. रिसर्चनुसार सध्या पृथ्वीच्या सुमारे ३० दशलक्ष लोकांभोवती असलेला पृथ्वीचा परिसर या घरांमध्ये सन २०५० पर्यंत किमान एकदा तरी समुद्र आपला उद्रेक नक्कीच दाखवेल. याआधी नासाने केलेल्या अभ्यासानुसार जवळपास ८ कोटी लोकांना पर्यावरणीय बदलांमुळे समुद्रातील पाण्याच्या वाढत्या स्तराचा फटका बसणार होता.
संशोधकांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अचूक निष्कर्ष मिळविण्यात यश प्राप्त केले आहे. याआधीच्या मॉडेलमध्ये उपग्रह डेटाचा उपयोग करण्यात आला होता. ज्यात बिल्डिंग आणि झाडांमुळे जमिनीची उंची दाखविण्यात आली होती.  संशोधकांच्या मते , पहिल्या आणि आताच्या रिसर्चमध्ये खूप अंतर आहे. या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि  हवामान केंद्राचे  ज्येष्ठ वैज्ञानिक स्कॉट कुलप  यांनी सांगितले कि, हा रिसर्च शहरे , अर्थव्यवस्था, समुद्र किनारे आणि आपल्या जीवनकाळात, संपूर्ण जागतिक प्रदेश बदलण्याची हवामानातील संभाव्यता  दिसून येते.
तज्ज्ञांच्या मते, हीच परिस्थिती कायम राहिल्यास या शतकाच्या मध्यापर्यंत व्हिएतनाम आणि भारतमधील बरेच भाग पाण्यात बुडून जाऊ शकतात. यात मुंबईसारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा मोठ्या प्रमाणात समावेश असेल.  जे  १.८ कोटीहून अधिक लोकांचे घर आहे. आणि पुढील ३० वर्षांत जवळजवळ पूर्णपणे पाण्यात बुडेल.

Visit : Policenama.com