इंजिनला वाटतं इंजिन तोंडाच्या वाफेनेच चालतं : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – या निवडणुकीत काँग्रेसने इंजिन भाड्याने घेतले आहे. आणि हे इंजिन चालत नाही, हालत नाही, डुलत नाही. आणि या इंजिनला वाटतं की हे इंजिन तोंडाच्या वाफेनेच चालतं असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २९ एप्रिलला चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र्रातील १७ मतदार संघांचा समावेश आहे. याचदरम्यान, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. काही लोक इतकी नादान आहेत की त्यांना शौचालय कशी बदलली जातात हे माहित नाही. आणि तुम्हाला सर्वांना माहीतच असेल मुंबईत पक्ष भाड्याने मिळत आहे. पूर्वी सायकल भाड्याने मिळायची, गाडी भाड्याने मिळायची मात्र या निवडणुकीत काँग्रेसने इंजिन भाड्याने घेतले आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, आणि हे जे इंजिन आहे ते चालत नाही, हालत नाही, डुलत नाही. आणि या इंजिनला वाटतं की हे इंजिन तोंडाच्या वाफेनेच चालतं. असा टोलाही त्यांनी लगावला.