विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा ‘पाऊस’

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत अनेक मोठ्या घोषणा केल्या. मुंबई, नाशिक आणि पुणे या शहरांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्या. याचबरोबर मोठ्या शहरांमध्ये सुरु असलेले मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी विधानसभेत केली. त्याचबरोबर मुंबईच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद देखील केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर मुंबई आणि पुण्यातील अंतर अर्ध्या तासावर आणण्यासाठी हायपरलूप प्रकल्प देखील लवकरच सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच विरार आणि अलिबाग या १२३ किलोमीटरच्या कॅरिडॉरमुळे मुंबईच्या आसपासच्या शहरांचा चेहरा बदलणार आहे. याविषयी विधानसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच मल्टी कॅरिडाॅर मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेला देखील जोडला जाणार आहे. या हायवेवर सात विकास केंद्र होणार असून यामध्ये विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि तळोजा एमआयडीसीचा समावेश आहे.

यामुळे या सर्व भागाचा मोठा प्रमाणावर विकास होण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर मेट्रो प्रकल्पाचं काम वेगाने सुरु असून मेट्रोच्या भूमिगत मार्गाचं ५० टक्के काम पूर्ण झालं आहे. २०२१ पर्यंत याचा पहिला टप्पा तर २०२२ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. नाशिकमध्ये देखील आम्ही हायब्रीड मेट्रो सुरु करण्यावर विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर नाशिकचा डीपीआर तयार असून लवकरच तो कॅबिनेटसमोर मांडला जाईल असेदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच २०२० च्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पूर्ण केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

इतर महत्वाच्या घोषणा

१) मेट्रो, मोनो, लोकल ट्रेन, बसेस अशा सर्व दळवळणाच्या साधनांना सिंगल तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु

२) वसई-भाईंदर खाडी पुलाचे बांधकाम लवकरच सुरु

३) ट्रान्स हार्बर लिंक २२ किमीच्या समुद्री मार्गाचे काम वेगाने सुरु आहे

४) विरार ते अलिबाग मल्टी-मॉडेल १२३ किमी लांबीचा कॅरिडॉर नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी बंदराला जोडणार

५) नयना सिटीचा पहिला विकास आराखडा तयार झाला, तर दुसऱ्याला लवकरच मान्यता

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा

अशोक चव्हाणांना ८ वर्षांत न जमलेले ‘ते’ काम १ महिन्यात केले : खासदार चिखलीकर

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण