CM Eknath Shinde | ‘बरं झालं आपलं शेतकऱ्यांचं सरकार आलं, अन्यथा…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांवर टिकास्त्र (व्हिडिओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून (Nilwande Dam) पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते जलपूजन करून त्यानंतर कळ दाबून निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी प्रवाहीत करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, बरं झालं शेतकऱ्यांचं सरकार आलं. अन्यथा निळवंडे धरणातून अद्याप पाणी सोडलं गेलं नसतं, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

 

 

आजचा दिवस हा या भागातील शेतकऱ्यांचा आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस असून तब्बल 53 वर्षांनी इथल्या शेतामध्ये धरणातील पाणी खळाळणार असल्याने हा दिवस आनंदाचा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. राज्यात युती सरकार अस्तित्वात आल्यापासून 29 ते 30 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन 6 लाखांहून अधिक हेक्टर जमीन ओलिताखाली आणली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, या राज्याचा मुख्यमंत्री एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. याचा मला अभिमान आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून शेतकरी (Farmer) हिताचे निर्णय घेतले जात आहेत. जेव्हा मी गावी जातो तेव्हा मीही शेती आणि मातीत रमतो. मात्र, माझ्यावर टीका केली जाते की शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरमधून फिरतो. शेतकऱ्याचे मुलाने हेलिकॉप्टरमधून फिरू नये का? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. भिवंडीत एका शेतकऱ्याने स्वत:चे हेलिकॉप्टर घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

Advt.

आमचे सरकार सर्व निर्णय सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून घेत आहे. शेतकरी सुखी झाला पाहिजे हाच आमचा उद्देश आहे. निळवंडे धरणाचे काम 53 वर्षे रखडले. बरं झालं आपलं सरकार आलं, त्यामुळे तरी ते मार्गी लागले. अन्यथा अद्याप ते रखडले असते. या धरणाच्या पुढील कामाला निधी कमी पडू देणार नाही. राज्याचे अर्थमंत्री फडणवीसही येथे आहेत. त्यांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आहेत. मी फक्त सांगतो, ते लगेच तिजोरी उघडून पैसे देतात. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनीही चिंता करु नये, त्यांना मोबदला आणि पुढी कामासाठी निधी मिळणार यात शंका नाही, असेही शिंदे म्हणाले.

 

 

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले की, या धरणाच्या बाबतीत यापूर्वी काय झाले,
ते आता कालव्यातून वाहत असलेल्या पाण्यासोबत सोडून देऊ. स्वच्छ मनाने पुढे जाऊन काम करीत राहू, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

 

 

Web Title :  CM Eknath Shinde | is farmers son dont have a right to travel by helicopter
cm eknath shinde at nilwande dam event ahmednagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा