CM Eknath Shinde On Maratha Reservation | ‘मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाहीच’ – एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde On Maratha Reservation | कोणत्याही परिस्थितीत ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी येऊ देणार आहे, असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपुरात केले होते. यावर, मराठा आंदोलकांची मागणी ओबीसीमधून आरक्षण देण्याची आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना विचारला असता त्यांनी ओबीसी आरक्षणात कोणत्या मराठ्यांचा समावेश करणार आणि कुणाचा नाही याबाबत सविस्तर खुलासा केला आहे. (CM Eknath Shinde On Maratha Reservation)

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे रविवारी (१७ सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की आम्ही ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देणार नाही. पण आंदोलकांची मागणी ओबीसीमधून आरक्षण देण्याची आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. (CM Eknath Shinde On Maratha Reservation)

त्यावर शिंदे म्हणाले, समाजाची दिशाभूल होता कामा नये. जरांगे पाटील यांची मागणी काय आहे, ज्यांच्या नोंदी पूर्वी निजामकालीन असतील. ज्यांच्यावर कुणबी नोंद असेल आणि नंतर ती बदलली असेल तर त्याचा सर्व्हे केला जाईल. अशा लोकांची माहिती मिळवली जाईल आणि खरच कुणबी असेल तर त्याला ओबीसी दाखला मिळेल. ओबीसींना देखील यावर काहीच आक्षेप नाही.

पण, त्यांचा सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यावर आक्षेप आहे. तसेच अशी राज्याची अशी कोणतीही भूमिका, विचार नाही की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येईल. ओबीसी समाजाचे आरक्षण आहे तेवढेच ठेवून, मराठा समाजाचे रद्द झालेले आरक्षण मिळवून देण्याची मागणी मराठा समाजाची आहे. त्यामुळे ते आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. यासाठी सरकारचे काम सुरु आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सांगण्यावरुन उपोषण केले होते असा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले,
पटोले यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. काहीतरी गंभीर आरोप केल्यावर दखल घेतली जाईल असे त्यांना वाटते.
नाना पटोले माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे की,
यामध्ये एकनाथ शिंदे यांचा किंचित तरी हात आहे का?, पोटात एक आणि ओठावर एक असे काम मी करत नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar Public Meeting In Pune | अजित पवारांच्या पुण्यातील रोड-शो नंतर शरद पवारांची जाहीर सभा

Ujjwal Nikam Reaction On Maharashtra Political Crisis | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाळ कोणाचे?
उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान

Pune BJP | पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर ! 18 उपाध्यक्ष, 8 सरचिटणीस आणि 18 चिटणीस