CM Eknath Shinde | ‘घरी बसून फेसबुक लाईव्ह करणारे आम्ही नाही’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – आम्ही घरी बसून काम करणारे नाही, फेसबुक लाइव्ह, ऑनलाइन काम करणारे नाही. आम्ही घरा-घरात गावागावात जाऊन काम करणारे आहोत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांना टोला लगावला. आता विकासाची गाडी सुसाट धावते आहे. सगळे अडथळे काढून टाकले आहेत. शेतीचं नुकसान झालं तेव्हा मी बांधावर नाही थेट शेतावर गेलो. तिथल्या सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aplya Dari) या उपक्रमा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते.

 

तेव्हा राज्याचा विकास होतो

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुढे म्हणाले, सध्या मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी, तलाठी हे गावागावात जाऊन लागले आहेत. सरकारने घेतलेले निर्णय (Government Decision) लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम हे अधिकारी करत आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासाच्या रथाची दोन चाकं आहेत. ही दोन चाकं जेव्हा समान वोगाने धावतात तेव्हा त्या, गावाचा, शहराचा त्या राज्याचा विकास होतो. आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर सगळे अधिकारी चांगलं काम करत आहेत. आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त हे देखील वेगाने कामाला लागले आहे. त्यामुळे काय होतं की सरकारी यंत्रणा सक्रिय होते याचा लाभ जनतेला मिळतो.

 

https://twitter.com/mieknathshinde/status/1661652111959150594?s=20

 

मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ताच

आम्ही 24 तास काम करणारे कार्यकर्ते आहोत. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून उभा असला तरीही कार्य़कर्ता म्हणून कालही काम करत होतो, आजही कार्य़कर्ता म्हणूनच काम करतो आहे आणि उद्याही त्याच भूमिकेतून काम करत राहीन. काम करण्याची जी सवय आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) साहेबांनी शिकवण दिली, त्या माध्यमातून राज्याला पुढे नेत आहोत. कुणाचीही गैरसोय होता कामा नये हे आमचं लक्ष आहे.
सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्हाला नष्ट करायची आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

 

75 हजार नोकऱ्या देणार

आमचे सरकार आल्या आल्या 75 हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला.
बहुदा ते असं पहिलं सरकार आहे जे लोकांना बोलवून त्यांना नियुक्त्या देत आहे.
सर्वसामान्य लोकांचं भलं करणं हेच आमचं लक्ष्य आहे.
खासगी कंपन्यांचंही आम्ही जॉब फेअर केलं असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

 

Web Title :  CM Eknath Shinde | we did not did facebook live and online cm eknath shinde taunts to uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा