डिनर डिप्लोमसी : उद्धव ठाकरेंचे ‘भाजप’ आमदारांना स्नेहभोजनाचे ‘निमंत्रण’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. ठाकरे सरकारचं पहिलंच अधिवेशन असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना तर निमंत्रण देण्यातच आलं पण त्याबरोबरीने भाजपच्या आमदारांना निमंत्रित केले गेले. भाजप आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण पाठवण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

भाजप-शिवसेनेचे मागील 30 वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सध्या त्यांच्यात दुरावा असला तरी त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची डिनर डिप्लोमसी राजकीय चर्चेचा विषय ठरली. नागपूर अधिवेशन हे राजकीय कामकाजाबरोबर स्नेहभोजन आणि रात्रींच्या गप्पासाठी ओळखलं जातं. परंतु आता उद्धव ठाकरेंचं निमंत्रण स्विकारुन भाजपचे सदस्य जेवणाला जातात का याकडे सर्वांचे लक्ष असेल.

आज सभागृहात काय झालं
आजचा विधिमंडळाचा तिसरा दिवस, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सामना वृत्तपत्रातील जुने संदर्भ देखील वाचून दाखवले. सामनातून शरद पवारांवर निवडणूकीच्या आधी आक्रमक शब्दात टीका केली, त्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.

शरद पवार अफजल खान आहे, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, शरद पवार बकासूर आहेत, अशा आशयाच्या बातम्या देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी वाचून दाखवल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले. धनंजय मुंडे यांनी फडणवीसांच्या भाषणावर आक्षेप घेतला. ते म्हणाले की सभागृहात वर्तमानपत्र पुरावा म्हणून वाचता येत नाही असं फडणवीसच मुख्यमंत्री असताना म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांबद्दल वाचून दाखवलेले शब्द विधानसभाध्यक्षांनी रेकॉर्डमधून वगळले. त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्याची संधी देण्यात आली.

फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका
शिवसेना युतीतून बाहेर पडल्याची सल अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्या मनातून कमी झालेली दिसत नाही कारण याच मुद्द्यावर फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणतात की मी बाळासाहेबांना वचन दिले होते की महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन. पण तुम्ही असा शब्द दिला होता का, की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन, अशी टीका फडणवीस यांच्याकडून करण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/