सरकारने सुडाच्या भावनेने अर्णब गोस्वामीला अटक केलीय : प्रवीण दरेकर

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – पत्रकार अर्णब गोस्वामी ( Republic TV Editor-in-Chief Arnab Goswami) यांना ठाकरे सरकारने अहंकारी भावनेने अटक केली आहे. त्यांच्या या वृत्तीचा देशपातळीवर धिक्कार होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ((BJP Leader Pravin Darekar) यांनी केली. आम्ही ठाकरे सरकारची (cm-uddhav-thackeray) ही दडपशाही खपवून घेणार नाही. यापूर्वी देशात आणीबाणी लागू केली होती. तेव्हा देशातील जनतेने ती सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे भविष्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ही बातमी समजल्यानंतर आमदार राहुल नार्वेकर, रवी पाटील, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या हे प्रमुख नेते अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. नाईक यांच्या परिवाराला न्याय जरुर मिळाला पाहिजे. पण गोस्वामी यांनी राज्य सरकारवर टीका केल्यामुळे सरकार दुखावले गेले होते. त्यामुळे सरकारने सुडाच्या भावनेने कट रचून गोस्वामी यांना अटक केली, असा आरोप दरेकर यांनी केला.

अर्णब गोस्वामी हे केवळ निमित्तमात्र आहे. भाजप हा त्यांच्या बाजूने नव्हे तर प्रसारमाध्यमांच्या बाजूने उभा आहे. उद्या कोणत्याही पत्रकारावर अशाप्रकारे कारवाई झाली तर भाजप पक्ष इतक्याच ठामपणे उभा राहील. त्यामुळे गोस्वामी यांच्या निमित्ताने भाजपवर पोटशूळ काढण्याचे काही कारण नाही, असेही दरेकर म्हणाले.

भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकला- शिवसेनेचा टोला!
अर्णव गोस्वामी यांच्या अटेकवर ‘भाजपचा पोपट पिंजऱ्यात अडकला’ अशी खोचक टीका परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली आहे. तर अर्णब गोस्वामी आमचा पोपट नाही, आम्ही पोपट पाळत नाहीत. पोपट तेच पाळतात असा प्रत्यारोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे