‘दुसरं लग्न केल्यास हिंदू पुरुषावरही कारवाई करा’ : मुख्यमंत्र्यांचा आदेश

लखनऊ : वृत्तसंस्था – एक लग्न केलेलं असताना दुसरं लग्न करणाऱ्या हिंदू पुरुषावरही पोलिसांनी कारवाई करावी असं प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यानी केलं आहे. योगी यांनी बुधवारी ट्रीपल तलाक पीडित महिलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हिंदून महिलांच्या अधिकारांबाबतही वक्तव्य केलं.

योगी आदित्यनाथ म्हणाले, “उत्तर प्रदेशातून गेल्या वर्षभरात ट्रीपल तलाकची 273 प्रकरणं समोर आली आहेत. या सर्व प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मोदीजींनी ट्रीपल तलाकबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार. ज्या महिलांनी ट्रीपल तलाकसाठी लढा दिला त्यांचे आभार.”

‘आजही सोशल मीडियावरून ट्रीपल तलाक होत आहेत’

पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “ट्रीपल तलाकवर बंदी घालण्याचा आदेश 5 वेळा देण्यात आला आहे. शाहबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पुढे कारवाई झाली नाही. त्यानंतर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत निरपेक्षतेची चर्चा केली गेली. आजही सोशल मीडियावरून ट्रीपल तलाक होत आहेत. अशा परिस्थितीत कायद्याची गरज आहे.

‘आमची लढाई जोडण्याची आहे’

योगी आदित्यनाथ म्हणतात, “तोडणं सोपं असतं. पण जोडणं कठिण असतं. आमची लढाई जोडण्याची आहे. प्रत्येक महिला आणि मुलांना जगण्याचा आणि प्रगती करण्याचा अधिकार मिळायला हवा” असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

Visit : policenama.com