सोलापूरमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकानं वापरला ‘मोदींचा फॉर्म्युला’

पोलीसनामा ऑलनलाईन टीम – जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले आहे. भारतातही आता कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशावेळी कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून सर्व कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांनी घरूनच काम करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर विद्यापीठातील कॉमर्स विभागाच्या तरुण प्राध्यापकांनी फेसबुक लाईव्ह करत आपल्या विध्यार्थयाना धडे शिकवण्यास सुरुवात केली आहे.

डिजिटल माध्यमातून विध्यार्थयाना धडे दिले पाहिजेत अशी भावना पालक व्यक्त करत आहेत. अभ्यासक्रम पूर्ण व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचेयोग्य ते निरसन व्हावे असा हेतू आहे. 31 मार्च पर्यंत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आल्यामुळे अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा प्रश्न सर्वांसमोर होता. मात्र या प्राध्यापकांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करून आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो याचं उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना घरातून शिक्षणाचे धडे दिले आहेत. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिकवले आहे. त्यामुळे पालक आणि सोशल मीडियावर युझर्सनी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे. कोरोना विषाणूचे संकट जगावर आले असून त्याच्यासोबत दोन हात करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे .या विषाणूचा प्रसार आटोक्यात यावा यासाठी मोहीम राबवली जात आहे.