‘कॉमेडियन’ सुनील ग्रोवरनं शेअर केला मजेदार व्हिडीओ, सांगितलं ‘लॉकडाऊन’मधील ‘रूटीन’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशात सर्व कलाकार सोशल मीडियावर जास्त प्रमाणात सक्रिय दिसत आहेत. नुकताच कॉमेडियन सुनील ग्रोवर याचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे.

सुनीलनं त्याच्या इंस्टावरून त्याचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात दिसत आहे की, तो काही डॉयलॉग बोलत आहे. त्याचा गेटअपही काहीसं कॉमेडी आहे. त्यानं एक हट घातली आहे. आणि मोबाईल अडकवला आहे कानाजवळ. कोणतरी सुनीलला त्याचं रूटीन विचारतं तेव्हा प्रत्येक एका वाक्यानंतर तो सांगतो की, एक कप चहा पिला. खूपच कॉमेडी असा आहे व्हिडीओ आहे. तुम्हीही पहाल तर हसू आवरणार नाही. सध्या सुनीलचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

सुनीलचा आधीही असाच एक कॉमेडी व्हिडीओ समोर आला होता. यात तो आमिर खानची मिमिक्री करताना दिसत होता. यात तो मास्क आणि सॅनिटायदर 100 परसेंट नाही असं सांगत कॉमेडी करताना दिसला होता. त्याचा हा व्हिडीओदेखील सोशलवर खूप व्हायरल झाला होता.