‘समान’ कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या 5 नेत्यांची ‘समिती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेबरोबर राज्य स्थापन करण्याच्या दृष्टीने समान कार्यक्रम ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची संयुक्त समिती नेमण्यात येणार असून त्यासाठी राष्ट्रवादीने पाच जणांची नांवे निश्चित केली आहेत.

त्यामध्ये पक्षाचे विधीमंडळ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, नवाब मलिक आणि धनंजय मुंडे हे पाचजण राष्ट्रवादीकडून समितीत असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत ही नांवे जाहीर करण्यात आली. काँग्रेस पक्षही त्यांची नांवे निश्चित करेल आणि मग संयुक्त समिती होईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाचे नेते अहमद पटेल आणि शरद पवार यांची बैठक झाल्यानंतर ही समिती नेमण्यात आली. शिवसेनेबरोबर जाण्यासाठी वातावरण निर्मितीचा हा एक भाग मानला जातो.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like