#Surgicalstrike2 : सर्व मतभेद विसरून देशासाठी विधिमंडळात ‘राजकीय रंग’ एकत्र 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी लष्करी कारवाई करत भारताने पाकिस्तानमधील बालाकोट भागात थेट हल्ला केला असून या हवाई हल्ल्याद्वारे तेथील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले आहेत. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईमध्ये २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याबद्दल महाराष्ट्राच्या विधानसभेत भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करणारा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर भारतीय सेनेने दिल्यानंतर त्याचे पडसाद अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये उमटले. विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात भारतीय सेनेचे अभिनंदन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँगेसचे नसीम खान, समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत या कारवाईत भाग घेणाऱ्या जवानांचे अभिनंदन केले.
भारतीय हवाई दलाचे कौतुक –
या कारवाईनंतर भारतीय हवाई दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काँग्रेसचे अध्ययक्ष राहुल गांधी यांनी भारतीय हवाई दलानं केलेल्या कामगिरीवर ‘भारतीय वायु दलाच्या पायलटांना माझा सलाम’ असं ट्विट केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देखील राहुल गांधी यांनी कोणतंही राजकारण न करता आम्ही सरकारच्या पाठिशी ठाम उभे असल्याचं म्हटलं होतं. हवाई दलाचे आणि सैन्य दलाचे मी अभिनंदन करतो. प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेली गोष्ट झाली. अशाप्रकारचा कोणताही हल्ला भारत खपवून घेणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशावर कोणी वाईट नजर टाकत असेल तर त्यांना असेच चोख उत्तर मिळाले पाहिजे. भारतीय सेनेने केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पाकव्याप्त भागात भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे कौतुक करत अभिनंदन केले.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर १००० किलोचा बॉम्ब फेकला. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं.

महत्वाच्या बातम्या –

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला 

भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त 

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी 

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई 

त्या हजार जखमांच्या बदल्यात भारताने १००० बॉम्ब देणे योग्यच 

निवांत झोपा सांगून स्वतःच झोपले ; नेटकऱ्यांकडून पाकिस्तानची फिरकी

भारताचा पाकवर एअर स्ट्राइक : २१ मिनिटे सुरु होता हल्ला 

पाकिस्तानच्या मंत्रालयात तातडीची बैठक सुरु

पाकच्या विमानांनी केला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न 

‘या’ 10 हून अधिक जागांवर भारतीय हवाई दलाने केला हल्ला 

भारत कमजोर देश नाही : मुख्यमंत्री