सत्तास्थापना राहिली बाजूला पत्रावरून काँग्रेस – राष्ट्रवादीमध्ये ‘जुंपली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्ता स्थापनेचा तिढा राज्यात कायम असताना आता राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. मात्र काल शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा करून वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. परंतु राज्यपालांनी ही मागणी फेटाळली. शिवसेनेकडे इतर पक्षांच्या सहमतीचे पत्र नसल्यामुळे शिवसेनेनला काल सत्ता स्थापन करता आली नाही.

मात्र यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पत्रावरून चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळाले. एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रानं काहीही झालं नसतं. आम्हीदेखील काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढल्यानं दोघांनीही एकत्रित हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. काँग्रेसचे आमदार सध्या जयपूरला असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचण येत आहे. काँग्रेस सोबत आली तरच यातून काही मार्ग निघू शकतो, अशी माहिती काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली.

तर दुसरीकडे शरद पवार यांच्या सांगण्यामुळेच एक दिवस पुढे ढकलला असल्याची प्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये यावेळी चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळाले. राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकलं नाही.

तत्पूर्वी जास्त संख्याबळ असलेल्या भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भाजपने शिवसेनेने आपल्याला साथ न दिल्याने हा निर्णय घेत असल्याचे सांगितले होते.

Visit : Policenama.com