माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी सांगितली सत्तास्थापनेबाबत काँग्रेसची भुमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – युतीतल्या दोन पक्षांमध्ये तणाव आहेत. त्यामुळे बहुमत असूनही अद्याप युतीची सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही. आता जोपर्यंत शिवसेना या युतीतून बाहेर पडत नाही तोपर्यंत परिस्थितीवर तोडगा निघू शकत नाही असे विधान काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरून जोरादार हालचाली सुरू आहेत. भाजपा व शिवसेना दोन्ही पक्ष आपल्या भूमिकांवर ठाम आहेत.

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा वाढत चाललेला असताना भाजपविहित सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना मुंबईत वेग आला आहे. काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक झाली. भाजपने सेनेला दिलेलं आश्वासन पाळलं नाही. भाजप सेनेला जनतेने कौल दिला असला तरी राज्यातील सत्तेत भाजप नसावे अशीच काँग्रेसची भूमिका आहे. परंतु काँग्रेस पक्षाने अजून याबात अंतिम निर्णय घेतलेला नसल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

निवडणूक निकाल लागल्यापासून शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झालेला आहे.त्यामुळे १३ दिवस उलटूनही अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही.

Visit : Policenama.com