गोव्यात राजकीय भूकंपाचा सेनेचा इशारा, काँग्रेसनं घेतला ‘हा’ पवित्रा

पणजी : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात भाजपला सत्ताबाहेर ठेवण्यात शिवसेनेला यश आल्यानंतर शिवसेनेचे मनोधैर्य वाढले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यात देखील महाविकास आघाडीचा पॅटर्नचा इशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे. मात्र, याला गोवा काँग्रेसने शिवसेनेला खो घातला आहे. गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी सांगितले की, गोव्यातील भाजप सरकार कोसळल्यास आनंदच होईल. मात्र अशी शक्यता नाही कारण गोव्यात 40 पैकी 30 आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. त्यामुळे सरकार पाडण्याच प्रयत्न करण्यापेक्षा विरोधी पक्षात बसण्यालाच आमचे प्राधान्य आहे.

खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा देताना म्हटलं होते की, महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही राजकीय भूकंप होईल. गोव्यातील भाजपचे सरकार उलथवण्यासाठी प्रयत्न करणार. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून संजय राऊत अधिक आक्रमक भूमिका घेतली. लोकसभेपूर्वी भाजपने मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेला शब्द दिला होता, असे म्हणत राऊत यांनी शिवसेनीची मुख्यमंत्रीपदाबाबतची भूमिका मांडली. त्यांनी प्रत्येकवेळी शिवसेनेची भूमिका परखडपणे मांडली. त्यानंतर आता गोव्यात भाजपला धक्का देण्याच इशारा राऊतांनी दिला.

गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने सर्वाधीक जागा जिंकल्या होत्या. मात्र, भाजपने स्थानिक पक्षांना बरोबर घेत राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर काँग्रसचे आमदारही फोडले. त्यामुळे गोव्याच सत्ता काबीज करणं आणि ती राखणं भाजपला शक्य झाले. मात्र आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री विजय सरदेसाई आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com