काँग्रेसनं खूप काही दिलं… विखेंनी असं करायला नको होतं : बाळासाहेब थोरात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते उपस्थितीत होते. आजपर्यंत विखेंना काँग्रेसनं खूप काही दिलं त्यांनी असं करायला नको होतं. अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी ‘पोलीसनामा’शी बोलताना दिली.

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना थोरात म्हणाले,” सुजय विखे-पाटील भाजपात प्रवेश करणार हे तर होणारच होते. त्यांचे वडील विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना कृषिमंत्रिपद दिले होते. आजपर्यंत त्यांना काँग्रेसने खूप काही दिलं. असे असताना त्यांनी भाजप प्रवेश करायला नको होता. भारत अजून एवढा पुढे गेला नाही की एकाच घरात वेगवेगळ्या पक्षाचे लोक राहतील”. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये “आम्ही वडिलांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला आहे. आज माझी आई माझ्या निर्णयासोबत आहे की नाही हे मला माहित नाही तरीदेखील मी आज भाजपात जातो आहे ही माझी भूमिका आहे असे म्हंटले होते. याबाबत थोरात यांना विचारले असता बाळासाहेब थोरात यांनी ‘हा फक्त बोलण्याचा भाग आहे’ अशी प्रतिक्रिया दिली.