शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्यास काँग्रेस हायकमांड तयार नाही, गांधी कुटूंबातच मतभेद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बाहेरुन पाठिंबा देण्याच्या मनस्थिती काँग्रेस नसल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना काँग्रेस मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेस तयार नसल्याचे दिसत आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यास गांधी कुटूंबातच मतभेद असल्याचे दिसते आहे. यामुळे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची खलबतं उलथण्याची शक्यता आहे.

राज्यातील आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार असताना काँग्रेस हायकमांड मात्र यासाठी अनुकूल नसल्याचे कळते आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध असल्याचे कळत होते. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी सुरु असलेले शिवसेनेच्या तयारीला खिळ लागतो की काय अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

काँग्रेस आणि शिवसेनेतील विचारप्रणाली वेगळी असल्याने काँग्रेस शिवसेनेला सत्तास्थापनेला पाठिंबा देण्यास अनुकूल नसल्याचे दिसते आहे. शिवसेनेला राज्यपालांनी दिलेल्या वेळेनुसार सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिले आहेत. परंतू शिवसेनेच्या सत्ता स्थापनेची गाडी यामुळे दूर राहिल की काय अशी शक्यता वाढली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकतेच सत्तास्थापनेची आणि शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल वातावरण आहे का याची माहिती जाणून घेण्यासाठी राज्यातील आमदारांची फोन वरुन चर्चा केली आहे. परंतू आज सुरुवातीपासून काँग्रेस हायकमांडकडून नकाराची घंटा वाजत असताना आता ते बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार नसल्याचे कळते आहे.

Visit : Policenama.com