शरद पवार आणि PM मोदी यांच्या भेटीवर सोनिया गांधी नाराज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पाऊण तास बैठक झाली. संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष या भेटीकडे लागून होते. शरद पवारांनी दिल्लीला जाताच केलेल्या विधानांमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र शरद पवार आणि मोदी यांच्यातील भेटीनंतर चर्चांना मोठ्या प्रमाणावर उधाण आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या आधी राष्ट्रवादी पक्षावर स्तुती सुमने उधळली होती. परंतु पवार आणि मोदी भेटीमुळे सोनिया गांधी नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. संसदेतून बाहेर पडताना ज्यावेळी सोनिया गांधींना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी केवळ ‘नो कमेंट’ म्हंटल होत. त्यावरून त्या नाराज असल्याचं देखील सांगण्यात आलं होत.

पवारांनी चुकीच्या वेळी मोदींची भेट घेतली असं अनेक काँग्रेस आमदारांना वाटत मात्र या भेटीचा परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात होणाऱ्या चर्चेवर कितपत होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मोदी यांच्या बैठकीनंतर काय म्हणाले पवार
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीमध्ये पाऊण तास चर्चा झाली. राज्यातील विधानसभेच्या निकालानंतर निर्माण झालेली राजकीय कोंडी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, ओला दुष्काळ या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसदेत भेट घेतली.

राज्यातील विधानसभेच्या निकालानंतर निर्माण झालेली राजकीय कोंडी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, ओला दुष्काळ या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसदेत भेट घेतली.तसेच या भेटी दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देखील बोलावण्यात आले होते. तसेच बैठक झाल्यावर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यात पुन्हा चर्चा झाल्याचे समजते.

पंतप्रधानांबरोबर झालेल्या या बैठकीत शरद पवारांनी मोदींना एक पत्र देखील दिले आहे. या पत्रात राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले आहेत.

1. शेतकऱ्यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी द्या.
2. कृषीकर्ज पूर्ण माफ करा.
3. राज्यातील राष्ट्रपती राजवटीमध्ये पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करावा.
4. मोठ्या मदतीसाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.

Visit :  Policenama.com