NCP Chief Sharad Pawar | काँग्रेस-राष्ट्रवादी मधील तणाव निवळला? बाळासाहेब थोरात पोहोचले शरद पवारांच्या घरी (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी भेटीचे सत्र सुरु आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ खडसे (Eknath Khadse), खा. संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी मागील आठवड्यात शरद पवार यांची भेट घेतली. आता महाविकास आघाडीमधील दुरावे पाहता आज काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री (Balasaheb Thorat) यांनी पवारांची भेट घेतली आहे.

आघाडीत कुरबुरी सुरु
महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरु आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची परस्पर घोषणा केल्याने त्यात आणखी भर पडली होती. यावर वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी नेते जर दुसऱ्यांच्या अखत्यारीतील, खात्यांचे निर्णय मीडियासमोर जाहीर करत असतील, तर मी काय चुकीचे केले, अशी नाराजी व्यक्त केली होती. यावरुन तिन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते.

पदोन्नतीवरुन नितीन राऊत आक्रमक
पदोन्नती आरक्षणाच्या (Promotion reservation) मुद्यावरुन काँग्रेसचे (Congress) नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आक्रमकपणे बाजू लावून धरली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आम्हाला विश्वासात न घेता पदोन्नती आरक्षणाचा निर्णय घेतला, असा आरोपच राऊत यांनी केला होता. त्यानंतर अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला.

थोरातांनी घेतली पवारांची भेट
या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या Sharad Pawar निवासस्थानी जात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. यामध्ये काय बोलणे झाले, याची माहिती देण्यात आली नाही. परंतू ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले आहे. शरद पवार Sharad Pawar यांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पवारांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी सत्ताधारी मित्रपक्षातील नेते आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस देखील शरद पवारांची भेट घेण्यासाठी घरी गेले होते.

Also Read This : 

अहमदनगर ! काय सांगता ! होय, पोलिस कर्मचार्‍यानं सहकारी महिलेला मिठीत घेण्याचा केला प्रयत्न, अन्…

रात्री ब्रा घालुन झोपणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Cryptocurrency Price Today : आज कोणते चलन तुम्हाला बनवणार ‘मालामाल’, ‘इथं’ तपासा संपुर्ण यादी

पाठीच्या मणक्याच्या वेदना आणि प्रतिबंधात्मक उपाय; जाणून घ्या

Income Tax विभाग आज लाँच करणार नवीन वेबसाइट, टॅक्सपेयर्सला मिळतील ‘या’ सुविधा; जाणून घ्या