सचिन पायलट यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…

ADV

जयपूर : वृत्तसंस्था –   राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी देशातील आर्थिक स्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशाची घसरलेली अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी केंद्र सरकारकडे कोणतंही धोरण नाही असं ते म्हणाले आहेत.

सचिन पायलट म्हणाले, “आतापर्यंत केवळ घोषणाच होताना दिसत आहेत. प्रोत्साहनाच्या घोषणाही अर्थमंत्र्यांनी दिल्या. मात्र देशातील छोट्या उद्योगपतींना, कारखानदारांना, मध्यमवर्ग आणि पगारी लोकांना आर्थिक मदत मिळताना दिसत नाही. जीडीपीचे आकडे धक्का देणारे आहेत. भविष्यात त्यासाठी काय कराला हवं याबाबत केद्र सरकारला चिंता आहे असं वाटत नाही. केंद्र सरकारकडे एखादं ठोस धोरण आहे असं वाटत नाही.”

पुढे बोलताना पायलट म्हणाले, “अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकारनं एक सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे. अर्थव्यवस्थेला पुन्हा रूळावर आणण्यासाठी काय करता येईल यावर सर्वांचं मत विचारात घ्यायला हवं.”

संसदेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास होण्याबद्दल पायलट म्हणाले, “प्रश्न विचारणं हा खासदाराचा सर्वात मोठा अधिकार असतो. जर तुम्ही तोच अधिकार हिरावून घेत असाल तर संसदेचं अधिवेशन बोलावण्यालाही काय अर्थ आहे.” अशी टीका त्यांनी केली.