मंदिरात तुला करताना मंत्री पडले ; डोक्याला ११ टाके

तिरुवअनंतपुरम : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर आज एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी पूजेच्या विधीदरम्यान तुला करताना त्यांचा तोल जाऊन ते खाली पडली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला असून, जखमेच्या ठिकाणी ११ टाके पडले आहेत.

शशी थरूर हे काँग्रसकडून तिरुवअनंतपुरमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. सोमवारी ते प्रचाराला सुरुवात करणार होते. प्रचाराला सुरुवात करण्याआधी ते एका मंदिरात पूजेसाठी गेले होते. पुजेच्या विधीदरम्यान त्यांची तुला करण्यात आली. तुला करत असताना त्यांचा तोल जाऊन पडले.

या घटनेमुळे तिथे काही वेळ गोंधळ उडाला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या डोक्याला मार लागला असून, जखमेच्या ठिकाणी ११ टाके पडले आहेत. थिरुरु यांची प्रकृती स्थिर असून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

You might also like