कोरोनामुळे महसूल कमी अन् खर्च जास्त होतोय, त्यामुळे निधी मिळण्यात अडचण

नाशिकः  पोलीसनामा ऑनलाईन – आमच्यात कोणताही वाद नाही, काँग्रेस पक्षही कोणावर नाराज नाही. कोरोनावर खर्च होत असल्यामुळे सरकारी तिजोरीतील निधी कमी पडत आहे. सध्या पैशांची आवकही कमी अन् खर्च जास्त होत आहे. त्यामुळे काही खात्यांना निधी कमी पडत असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ( Congress state president Balasaheb Thorat) यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉग्रेसच्या आमदारांना सेना, राष्ट्रवादीपेक्षा कमी निधी मिळत असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत सापत्न वागणूक मिळत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दिवाळी पूर्वी राज्य परिवहन मंडळाला पॅकेज जाहीर केले गेले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. तसंच पॅकेज एमएमईबीला देखील मिळणे अपेक्षित होते, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवल होते. दुसरीकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा वीज बिलातील सवलतीचा प्रस्तावही बारगळल्याची चर्चा आहे. दरम्यान, थोरात यांनी नगरविकास खात्याकडून काँग्रेसच्या नगर पालिका आणि महानगर पालिकांना निधी कमी मिळाला असल्याचे सांगितले होते. मात्र, आगामी अर्थसंकल्पात ही त्रुटी दूर केली जाणार असल्याचे थोरात म्हणाले. आमच्याकडे असलेल्या खात्यांवरील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याचेही ते म्हणाले.

You might also like