काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेणार ? चर्चेला उधाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जनतेमध्ये काँग्रेसची दिशाहीन आणि लक्ष्यहीन होत असलेली धारणा संपवण्यासाठी पूर्णवेळ अध्यक्षाची मागणी, काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी केली आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपला आहे. पण अद्यापही राहुल गांधी यांनी पुढील काळात काँग्रेसचं नेतृत्व संभाळण्यास तयार नसल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये चिंता निर्माण झाली, असतानाच थरूर यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आलं आहे.

एका वृत्तवाहिनीला बोलताना थरूर म्हणाले, पुन्हा एकदा काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्याजवळ ‘साहस, क्षमता आणि योग्यता’ आहे. मात्र, तरी सुद्धा ते अध्यक्ष होत नसतील तर पक्षाला नवीन अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेची मदत घ्यावी लागेल. तसेच माझी निश्चितच अशी इच्छा आहे पक्ष पुढे चालत राहण्यासाठी स्पष्टता असायला हवी. गेल्या वर्षी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नियुक्तीचा मी स्वागत केलेलं. पण अनिश्चित काळाकरता पक्षाच्या अध्यक्षाची जबाबदारी त्यांच्याकडे देणं योग्य ठरणार नाही.

मग यासंदर्भात अध्यक्षपदासाठी पक्षाकडून निवडणूक घेण्यात येईल का? असा प्रश्न विचारला असता थरूर यांनी म्हटलं की, जर राहुल गांधी यांना पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेऊ वाटत नसेल तर निवडणूक घेणं हा शेवटचा पर्याय उपलब्ध राहतो. मात्र या पुढे पक्षाला काय योग्य वाटेल, त्यानुसार पुढील प्रकिया राबवण्यात येईल.