तिजोरीत खडखडाट असल्याने निवडणुकीसाठी काँग्रेस मागणार जनतेकडे पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आगामी २०१९ची निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस घरोघरी जाऊन निधी गोळा करणार आहे. केवळ पैसे जमा करणे हाच यामागचा उद्देश नसून जनसंपर्क वाढविणे आणि काँग्रेसची लोकांमध्ये छाप निर्माण करणे हाही यामागील उद्देश आहे. सर्वात मोठा आणि जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला सध्या पैशांची कमतरता भासत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fd4a568f-bbcc-11e8-a0f4-21c832f36ff4′]

पक्षाने प्रत्येक बूथ समितीला पाच हजार रुपये जमा करण्याचे उद्दीष्ट देण्यात आहे. यावेळी प्रत्येक घरात काँग्रेसच्या कार्याची माहिती देणारी पत्रके वाटण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातून ५०० कोटींचा निधी जमा करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. देशातील एकूण १० लाख बूथमधून हा निधी जमा केला जाणार आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबला हे अभियान सुरू  होईल. इंदिरा गांधी जयंतीदिवशी १९ नोव्हेंबरला ते समाप्त होईल. निवडणुकीसाठी जमा केला जाणारा हा निधी केवळ घरोघरी फिरुन जमा केला जाणार नाही. तर ऑनलाईन पद्धतीनेही जमा करता येणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी पक्षाचे नवे कोषाध्यक्ष अहमद पटेल यांनी सर्व प्रदेश कोषाध्यक्ष आणि अध्यक्षांची बैठक घेतली होती. यावेळी अभियानाबाबत सांगताना पक्षाचे संघटन महासचिव अशोक गेहलोत म्हणाले की, पूर्वीही घरोघरी फिरुन पैसे जमा करण्याचे अभियान चालवले जात असे. पक्ष पुन्हा एकदा जनसंपर्काने निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. याचबरोबर सरकारचे अपयश आणि इतर राष्ट्रीय मुद्द्यांवर लोकांमध्ये जागृती केली जाणार आहे.

पुण्यात दुचाकीस्वाराला धडक देणाऱ्या कारचालकाला तीन महिन्यांची कैद