‘या’ स्टेप्स फॉलो करा आणि मोदींना खोटं बोलण्याच्या स्पर्धेत हरवा, काँग्रेसचे ट्विट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेठी दौऱ्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधाला आहे. पंतप्रधान मोदीं प्रमाणे खोटं बोलायला शिका अशा मथळ्याखाली काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यासाठी काही स्टेप्स देखील येथे देण्यात आले आहेत. या तीन स्टेप्स फॉलो करून तुम्ही ‘ भारतातील सर्वात मोठा खोटारडा ‘ होण्याच्या शर्यतीत मोदींना हरवू शकता, असा मजकूर वापरून काँग्रेसने ३ मिनिटे २० सेकंदांचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या ट्विटच्या शेवटी #ModiLies हा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे.

काय आहे ट्विट ?

काँग्रेसने तयार केलेल्या या व्हिडीओमध्ये उपहासात्मक पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे. सुरुवातील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे, ‘देअर वील बी नो लाइज’ (म्हणजेच या पुढे खोटे खपवून घेतले जाणार नाही) हे वाक्य दाखवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ ‘इस सज्जन को क्या तकलीफ हैं भाई’ हे मोदींच्या एक सभेतील त्यांच्याच तोंडचे वाक्य असणारी क्लिप वापरण्यात आली आहे. अनेकदा फॉरवर्ड होणारे मेसेजेस, मोदींकडून देण्यात येणारे चुकीचे संदर्भ या सर्वांचा आधार घेत आम्ही तुम्हाला मोदींप्रमाणे खोटं कसं बोलावं याबद्दलचा हा क्रॅश कोर्स शिकवणार असल्याचे काँग्रेसने व्हिडीओत म्हटले आहे.

व्हिडिओत खोटं बोलण्याच्या स्टेप्स

पुढे काँग्रेसने मोदींसारखे खोटं बोलण्यासाठी तीन टिप्स या व्हिडीओत दिल्या आहेत. त्यात त्यांची जुनी वक्तव्यांच्या व्हिडीओ क्लिप्सचा वापर करण्यात आला आहे. पहिल्यांदा स्वत: मधील दोष शोधा आणि नंतर ते दुसऱ्यांचे असल्याचे सांगा ही पहिली स्टेप असल्याचे या व्हिडीओत म्हटले आहे. दुसरी स्टेप म्हणजे एखादं वक्तव्य घ्या आणि त्याचा काहीतरी जगावेगळा अर्थ शोधून काढा. दुसरा मुद्दा सांगताना काँग्रेसने काळा पैसा परत आल्यावर १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील या वक्तव्याचा दाखला दिला आहे. तर तिसरी स्टेप म्हणजे प्रत्येक वक्तव्याची सुरुवात भाइयों और बेहनो अशी करा असा सल्ला या क्रॅश कोर्सबद्दल बोलताना काँग्रसने दिला आहे.

व्हिडीओच्या शेवटी पुन्हा एकदा मोदींच्या भाषणातील एक क्लिप वापरुन खोटं कसं बोलावं हे खुद्द मोदीजींकडूनच ऐका असं सांगत वापरण्यात आला आहे. ‘नेहमी खोट बोला, जे बोलता येईल ते खोटं बोला, जिथे आणि जेव्हा जेव्हा बोलता येईल तेव्हा खोटं बोला, कोणत्याही विषयावर बोला पण खोटं बोला.’ असं मोदी एका भाषणादरम्यान बोलतानचा हा व्हिडीओ आहे.