अन् राम कदमांविरोधात आंदोलन करायला गेलेल्या काँग्रेसच्या महिला आपसातच भिडल्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यातल्या सर्वच काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याच्या सूचना आल्या होत्या. मात्र या आंदोलनाचा निरोप वेळेत न मिळाल्यामुळे, कोल्हापुरातील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये आज चांगलीच जुंपली.

भाजपच्या आमदार राम कदम यांचा निषेध नोंदवण्यासाठी, कोल्हापुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना दोन वाजण्याची वेळ देण्यात आली  होती. दोन वाजता काँग्रेस कमिटीमध्ये काही निवडक महिला कार्यकर्त्या पोहोचल्या.  2 वाजून गेल्यानंतरही महिला शहराध्यक्ष आणि त्यांच्या गटातील महिला वेळेवर पोहोचल्या नाहीत. त्याच्या अगोदरच पोहोचलेल्या महिलांनी हे आंदोलन उरकून टाकलं.

उशिरा आलेल्या महिलांना याचा चांगलाच राग आला आणि या महिला कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस कमिटीच्या परिसरातच चांगलीच जुंपली. एकमेकींचा उद्धार करणाऱ्या या कार्यकर्त्यांचे भांडण सोडविताना पुरुष कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले.
राम कदम यांचा पुतळा जाळला 
भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी काल मुंबईत मुलीं बदल काढलेले अपशब्द याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने जोरदार निषेध नोंदवण्यात आला.  आमदार राम कदम यांच्या पुतळ्याला चपला मारो आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला.
 भाजपाचे आमदार राम कदम यांनी काल घाटकोपर इथल्या एका कार्यक्रमात मुलींबद्दल अपशब्द काढल्या मुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत . त्यांच्या या विधानाच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी निषेध नोंदवण्यात येत आहे . आज कोल्हापुरातील कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने राम कदम यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले.  कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर परिसरात राम कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याला जोड्यांचा प्रसाद देण्यात आला . तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या पुतळ्याचं दहन केलं .यापुढे आमदार राम कदम जर कोल्हापुरात आलेत तर त्यांना महिलांच्या वतीने चपलांचा हार घालण्यात येईल असा इशाराही महिला कार्यकर्त्यांनी दिलेला आहे.
राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य

“कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा”, असं राम कदम म्हणाले.

राम कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मनसेचे जोडे मारो आंदोलन

[amazon_link asins=’B0777LX7TQ,B078RJN314′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ae919886-b0fa-11e8-80c6-092fe32df2df’]