Coronavirus : ‘लॉकडाऊन’मुळं घरी बसणार्‍यांना देखील ‘ऑन डयूटी’चं समजलं जाणार, मिळणार पुर्ण पगार, कुठलीही कपात नाही

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – अर्थ मंत्रालयाने सोमवारी म्हटले की, अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना जे लॉकडाऊनमुळे ड्युटीवर जाऊ शकत नाही त्यांचे वेतन कापले जाणार नाही आणि संपूर्ण रक्कम दिली जाईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘COVID19 च्या प्रसाराला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग आणि आयसोलेशनमुळे भारत सरकारसाठी काम करणाऱ्या कंत्राटी कामगार आणि आऊटसोर्स कर्मचाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. अशात अनेक कर्मचारी कामावर येऊ शकणार नाहीत. अर्थ मंत्रालयाने एक आदेश जारी करत म्हटले आहे की, अशा लोकांना ड्युटीवर असल्याचे समजले जाईल आणि त्यांचे वेतन पूर्णपणे दिले जाईल.

कार्यालयाच्या ज्ञापनपत्रानुसार वेगवेगळ्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने देशात COVID 19 चा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग आणि आयजोलेशनची घोषणा केली असून यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन आहे. कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाद्वारे मंत्रालय आणि विभागांमध्ये आवश्यक सेवा ठेवण्याबाबत आदेश दिले गेले आहेत.

ते म्हणाले की, सध्या असाधारण परिस्थितीत कोणत्याही अनावश्यक अडचणी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे कि असे कर्मचारी, जे COVID 19 मुळे लॉकडाऊन असल्याने घरात आहेत, त्यांना ड्युटीवर असल्याचे मानले जाईल.