मुंबई पोलीस रियाला वाचवण्याच्या प्रयत्नात, सुशांतच्या वडिलांचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन – सुशांतच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस रिया चक्रवर्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुशातंच्या आत्महत्येच्या घटनेबाबत चर्चा रंगल्या आहेत.

सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात रिया चक्रवर्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला या आशयाचे एक प्रतिज्ञापत्र सुशांतच्या वडिलांनी कोर्टात दाखल केले आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याआधी सुशांतच्या त्यांनी मुंबई पोलिसांवर इतरही आरोप केले होते. फेब्रुवारी महिन्यातच सुशांतच्या जिवाला धोका आहे अशी तक्रार मी नोंदवली होती असा दावा त्यांनी केला होता. मात्र अशी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणात पुन्हा एकदा पोलिसांवर आरोप करत ते रियाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. मात्र या घटनेनंतर सुशांतचा मृत्यू हा सिनेसृष्टीतली गटबाजी आणि घराणेशाही यामुळे झाला असाही एक आरोप झाला. या संदर्भातल्या बातम्या समोर आल्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्राच्या गृह खात्याने लक्ष घालून 40 जणांची चौकशी केली आहे. दरम्यान हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. सीबीआयच्या आरोपपत्रात सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्तीचं नाव आहे. तिची या प्रकरणात काल चौकशी करण्यात आली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like