Coronavirus : लिबियाचे माजी पंतप्रधान महमूद जिब्रिल यांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जगभरात कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. जगभरातील 204 देशात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. सोमवारीपर्यंत कोरोनाग्रस्त मृतांची संख्या 69 हजारांवर पोहोचली. यासह 12 लाख लोकांना कोरोना झाला. उपचारानंतर 2 लाख 62 हजार लोक बरे झाले आहेत.

या दरम्यान रविवारी रात्री उशीरा लिबियाचे माजी पंतप्रधान महमूद जिब्रिल (वय 68) यांचा मिस्रच्या राजधानी काहिरामध्ये निधन झाले. सांगण्यात येत आहे की त्यांना कोरोना झाला होता. वृत्तानुसार रविवारी माहिती होती की ते कोरोना संक्रमित झाले आहे आणि त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले. याआधी ते आयसोलेशनमध्ये देखील होते.

ज्रिबिल लिबीयाचे उदारमतवादी दलाच्या गठबंधन नॅशनल फोर्सेस अलायन्सचे प्रमुख होते. त्यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे.

एकीकडे युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना देखील कोरोनामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. जॉनसन यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली. मागील महिन्यात ते कोरोनामुळे संक्रमित झाले होते. 27 मार्चला बोरिस कोरोनाग्रस्त झाले होते. त्यांनीच ट्विट करत ही माहिती दिली होती.

जॉनसन यांनी ट्विट केले होते की, मागील 24 तासात मला लक्षण जाणवत होती त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत मी पॉझिटिव्ह आलो. परंतु मी व्हिडिओ कॉन्फरेंसद्वारे सरकारचे नेतृत्व करेल.

यानंतर डाऊनिंग स्ट्रीटचे प्रवक्ता म्हणाले होते की लक्षण दिसल्यानंतर गुरुवारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने जॉनसन यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती ज्यात ते पॉझिटिव्ह आले. डॉक्टरांच्या सल्लानंतर पंतप्रधान डाऊनिंग स्ट्रिटपासून वेगळे राहत आहेत, आता ते रुग्णालय दाखल झालेले आहेत

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like