Coronavirus : होय, 14 नव्हे तब्बल 20 दिवसांनी दिसली ‘कोरोना’ची लक्षणे

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत असून भारतातही भीती वाढत आहे. सध्या भारतात कोरोनाची 1 हजार 251 प्रकरणे आहेत. त्यामुळे येते काही दिवस भारतासाठी महत्त्वाचे असणार आहे. प्रामुख्याने कोरोनाची लक्षणे उशीरा दिसल्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार केले जात नाही आहेत. भारतात पहिल्यांदाच लखनऊमध्ये एका रुग्णात तब्बल 20 दिवसांनी कोरोनाची लक्षणे दिसली आहे. त्यामुळे कोरोना सध्या वर्तणूक बदलत असल्याचे दिसत आहे.

मानवी शरीरात कुठल्याही नव्या विषाणूचा तग धरून संसर्ग पसरवण्याचा एक पॅटर्न असतो. या पॅटर्नला छेद देणारी केस भारतात सापडली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. साधारणत :14-15 दिवसांत कोरोनाची लक्षणे दिसून येतात. त्यानंतर त्या रुग्णांची चाचणी केली जाते. क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतर आठवड्याभरात रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही हे कळते. मात्र पहिल्यांदाच हे कळण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागला. कोरोनाची लागण झालेली ही महिला वृद्ध असून, याआधी तिच्या 35 वर्षीय डॉक्टर सुनेला कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेची प्रकृती स्थिर असली तरी, चखङ चाचणीचे रिपोर्ट तब्बल 20 दिवसांनी आले ही चिंतेची बाब आहे. एक ते दोन आठवड्यात कोरोनाची लक्षणे दिसणे अपेक्षित आहे. भारतात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. दरम्यान, भारतात कोरोनाने अद्याप फार डोके वर काढलेले नाही. तिसर्‍या टप्प्यात पोहोचला नाही. 21 दिवसांचा लॉकडाऊनची मुदत वाढविण्याची तातडीची योजना नाही, असे सोमवारी सरकारने सांगितले आहे. भारतीय सैन्याने पुढील महिन्यात संभाव्य आणीबाणीच्या घोषणेविषयी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेली ’बनावट’ पोस्ट नाकारले आहे.