Ajit Pawar on Corona Vaccination : ‘लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याच्या हडपसर येथे पहिल्या ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ सेंटरचं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केलं. त्यावेळी लस उत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीनं जागा उपलब्ध करून देण्यात आलीय. तिथे लवकरच लसीचं उत्पादन सुरू होईल. याद्वारे लसीकरण Vaccination वेगानं पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. तसेच, परदेशातून लस खरेदी करण्याचीही शासनाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘पुण्यातील ‘ड्राइव्ह इन’ व्हॅक्सिनेशन सेंटर ज्येष्ठ अन् दिव्यांगांसाठी वरदान ठरेल’ : अजित पवार

अजित पवार Ajit Pawar म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्यास राज्य सरकार कटिबध्द आहे. राज्यासह पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत खबरदारी घेण्याची गरज आहे. पुणे जिल्हा लसीकरणात Vaccination आघाडीवर आहे. हडपसरमधील ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ सेवा देणारे ठरेल, असा मला विश्वास आहे. असे अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राज्य सरकारने तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत बालरोग तज्ज्ञांचाही टास्क फोर्स तयार केला आहे. पावसाळ्यात कोरोना सोबत अन्य संसर्गजन्य आजार वाढणार नाहीत, यासंदर्भात दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. आपण सगळ्यांनी एकजुटीनं कोविड संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं जनतेनी काटेकोरपणे पालन करा. अशा सूचना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ मिळणार