Coronavirus : ‘लॉकडाउन’ असल्यानं घरात जाणवतोय स्ट्रेस ? ‘या’ 6 टिप्स फॉलो करा, मिळेल ‘आराम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने ३,५०,००० पेक्षा अधिक लोक संक्रमित झाले आहेत. भारतात देखील कोरोना विषाणूने ५०० पेक्षा अधिक लोक संक्रमित झाले आहेत. या प्राणघातक विषाणूच्या भीतीमुळे शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये बंद करण्यात आली आहेत. सरकारने देशभरात लॉकडाउनची घोषणा केली आहे. दरम्यान घरात बंदिस्तपणामुळे अनेक लोकांमध्ये मानसिक तणावाची समस्या उद्भवू लागली आहे. त्यामुळे लॉकडाउनमधील तणावाच्या समस्येचा सामना कसा करावा हे जाणून घेऊया…

१) संगीत, वाचन, चित्रकला –

जर आपल्याला एकटेपणा वाटत असेल किंवा मानसिक तणाव तुमचा पिछा सोडत नसेल तर चांगल्या गोष्टी वाचायला आणि लिहायला सुरुवात करा. आपल्याला आवड असेल तर आपण चित्र देखील काढू शकता किंवा आपले आवडते संगीत ऐकू शकता.

२) मॉर्निंग वॉक –

सकाळी धावणे सुरू करा. ताज्या हवेत मुक्तपणे श्वास घेतल्यास, आपला मेंदू योग्य दिशेने वाटचाल करतो आणि आपण प्रत्येक गोष्टीत हायपर होणार नाहीत.

३) मित्रांशी बोला –

जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा लोकांना भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची प्रचंड इच्छा होत असते. अशा परिस्थितीत आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मित्रांसह संपर्क साधू शकता.

४) व्यायाम करणे –

व्यायामामुळे आरोग्य तर चांगले राहतेच, परंतु आपला ताण देखील कमी होतो. व्यायामामुळे आपल्या शरीरातील हॅपी हार्मोन्स रिलीज होतात, ज्यामुळे काही क्षणांत आपला ताण कमी होतो. परंतु आपल्याकडे व्यायामाला वेळ नसेल तर आपण दिवसातून १५ ते २० मिनिटे नक्कीच चालावे.

५) निरोगी आहाराचे अनुसरण करा –

असे म्हणतात की आपण ज्या प्रकारचा आहार आपल्या जेवणात समाविष्ट करतो, आपला स्वभाव देखील तसाच होतो. म्हणून नेहमी निरोगी अन्नाचे सेवन करावे.

६) पुरेशी झोप घ्यावी –

जे लोक अपुरी झोप घेतात त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. झोपेच्या कमतरतेमुळे लोकांना विविध शारीरिक आणि मानसिक आजार जडतात. जर आपण चांगली झोप घेतली तर दिवसभर शरीराची उर्जा टिकून राहते. तसेच, आपण आपले कार्य योग्य प्रकारे करण्यास सक्षम असाल आणि आपला मूड पूर्वीपेक्षा चांगला होतो. माणसाला कमीत कमी ७ ते ९ तास झोप घेणे आवश्यक असते.