Coronavirus : देशात ‘कोरोना’ रुग्णांचा आकडा 13 लाखांवर, रिकव्हरी रेट 63.45%

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. देशात दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना संक्रमित रुग्ण समोर येत असून आता आकडा 13 लाखांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढून 63.45 टक्के झाला आहे.

covid19india.org नुसार देशात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 13 लाखांहून अधिक लोकांना लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात 24 जुलै रोजी सकाळ पर्यंत 12,87,945 जणांना देशात कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याच वेळी 8,17,209 कोरोना रुग्णांवर उपचार देखील केले गेले आहेत. या व्यतिरिक्त कोरोना विषाणूमुळे 30,601 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी आरोग्य मंत्रालयामार्फत कोरोना विषाणूच्या रुग्णांची अधिकृत माहिती जाहीर केली जाईल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण आता 63..45 टक्क्यांवर पोहोचले आहे.

दरम्यान, देशातील कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र सर्वाधिक बाधित राज्य आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या साडेतीन लाखाहून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. त्यांनतर तामिळनाडू दुसर्‍या स्थानावर आहे, जिथे जवळपास 2 लाख कोरोना संक्रमित रूग्ण समोर आले आहेत. यानंतर दिल्लीत 1.27 लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची पुष्टी झाली आहे.