Coronavirus : इटलीत आतापर्यंत 10000 ‘कोरोना’बाधितांचा ‘मृत्यु’,एकाच दिवसात आढळले 6000 नवे रुग्ण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा इटलीतही थैमान थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. जगातील सर्वाधिक मृत्यु इटलीत आतापर्यंत झाले असून २८ मार्चअखेर इटलीमधील कोरोना बाधितांची संख्या तब्बल १० हजार २३ झाली आहे. शनिवारी एकाच दिवसात ८८९ जणांचा मृत्यु झाला आहे. त्याचवेळी एकाच दिवसात नवीन ५ हजार ९७४ नवीन कोरोनाने संक्रमित झाल्याचे दिसून आले आहे.

चीनमधील वुहान शहरात सर्वात प्रथम कोरोनाचा फैलाव झाला होता. त्यानंतर तो इटलीमध्ये पसरला. सुरुवातीच्या काळात काळजी न घेतल्याने त्यांचा प्रसार प्रचंड वेगाने होत गेला.

इटलीमध्ये २१ फेब्रुवारीला पहिला बळी गेला. त्यानंतर २ मार्चपर्यंत ५२ जणांचा मृत्यु झाला होता.
१० मार्चला ही संख्या ६३१
१५ मार्च ला ही संख्या १८०९
२० मार्चला ४०३२
२५ मार्चला ७३०३
आणि २८ मार्च ला ही संख्या १० हजार २३ पर्यंत पोहचली आहे. याबरोबर इटलीमध्ये १ मार्चपर्यंत दररोज १२ जणांचा मृत्यु होत होता.१०मार्चला तो दररोज ११६ पर्यंत पोहचला.१५ मार्चला तो ३६८ पर्यंत गेला.त्यानंतर २० मार्चला तो ६२७ जणांपर्यंत गेला.  २५ मार्चला ६८३ जणांचा दररोज मृत्यु होऊ लागला. आणि आता २८ मार्च रोजी एकाच दिवशी ८८९ जणांचा मृत्यु झाला आहे. इटलीमध्ये सध्या ७० हजार ६५ जण संक्रमित असून त्यापैकी ३ हजार ६५६ जणांची प्रकृती गंभीर आहे. तसेच २८ मार्च रोजी इटलीत ५ हजार ९७४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे इटलीतील कोरोनाचे थैमान आणखी काही दिवस तरी थांबण्याची शक्यता नाही.