Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 371 नवे पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 371 नवे पॉझिटिव्ह आढळले असून तिघांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील एकाचा आज पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 4 हजार 467 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 342 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 70 हजार 350 वर गेली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 60 हजार 487 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 5 हजार 396 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकूण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 408 जण क्रिटिकल असून त्यापैकी 242 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी केलं आहे.

You might also like