Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चे 47 नवीन रूग्ण आढळल्यानं ‘टेन्शन’ वाढलं, महाराष्ट्रातील संख्या 537 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात आणखी 47 नवे रूग्ण आढळून आल्यानं आणखीनच टेन्शन वाढलं आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या 2902 वर जाऊन पोहचली आहे. मृत्यूचा आकडा देखील वाढत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 47 नवे रूग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 537 वर जाऊन पोहचली आहे.

मुंबईत तब्बल 28 नवीन रूग्ण आढळून आले आहेत तर ठाणे जिल्हयात 15 नवे पेशंट सापडले आहेत. अमरावती-1, पुण्यात 2 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 1 रूग्ण आढळून आला आहे. आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 537 वर जाऊन पोहचली आहे. देशामध्ये केवळ 12 तासात तब्बल 355 रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 2902 वर पोहचली आहे. देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन चालू आहे. सरकारने जनतेला घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तरी देखील काही बेजबाबदार लोक घराबाहेर पडून कोरोनाचा धोका ओढावून घेत असल्याचं पहावयास मिळत आहे.